राजकीयमहाराष्ट्र

शेकापला मोठा धक्का? हे दिग्गज नेते हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत


विशेष वृत्त : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सध्याचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाऊ पंडित पाटील हे लवकरच हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे रायगड जिल्ह्यात शेकापला राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


पंडित पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत बोलताना म्हटले, “रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग आहे आणि माझ्या प्रवेशामुळे भाजप जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष ठरेल.” तसेच त्यांनी नाव न घेता जयंत पाटील यांच्यावर टोला लगावत “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पंडित पाटील काय आहे, ते सर्वांना दिसेल,” असा सूचक इशाराही दिला.
पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
या घडामोडींनी रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शेकापमध्ये अंतर्गत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button