देश- विदेशमहाराष्ट्रराजकीयसांगोला

सवाल  जनतेचा : शेकापला जाहिरातीचे लागले आहेत का डोहाळे? चुकीची माहिती देऊन करत आहेत का जनतेची फसवणूक?

विरोधी पक्षातून केला प्रश्न ‘कामची चुकीची माहिती देऊन कशाला पाहिजे पोहच पावती?’


विशेष वृत्त : शेकापचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख गेल्या निवडणुकीत निवडून आले आणि पुन्हा तालुक्यात लालबावटा फडकला. लाल बावटा पुन्हा येणे शेकापसाठी अत्यंत गरजेचे होते हे हेरून आमदार डॉ. बाबासाहेबांनी पुन्हा लालबावटा फडकवला.

अलीकडे, शहरातील एखाद्या कामासाठी अनेक नेते त्यांचे कार्यकर्ते यांची जाहिरातबाजी सुरू आहे. “प्रत्येक जण म्हणतो मीच हे काम केले” या अशा वातावरणात मात्र प्रसिद्धीची गर्दीच होऊ लागली आहे.

दरम्यान, सांगोला एसटी बस आगाराला नवीन पाच बसेस मंजूर झाले असून त्या आगारात दाखल झाल्या आहेत. परंतु शेकाप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक की नजरचुकीने? या नवीन बसेसची वेगळीच माहिती आपल्या जाहिरातीतून केली.

शासणाचे पत्र वेगळे तर जाहिरात वेगळीच?

“पत्रात लिहिलय २५ बसेसची मागणी आणि जाहिरातीत मात्र ३० बसेसची मागणी”, “डोपोला पहिल्या टप्यात मिळाल्या ५ बसेस आणि जाहिरात ६ बसेस”, आपल्याच पक्षाचे पत्रव्यवहार सुद्धा पाहणे गरजेचे नाही का? यावर नक्की जनतेने समजायचे तरी काय? माहितीची खातरजमा न करता शेकापमधील काही कार्यकर्ते विरोधकांना दाखवून देण्यासाठी की काय म्हणून वाढीव,चुकीची माहिती देऊन जनतेची फसवणूक करत आहेत की काय असावा जनतेने उपस्थित केला?

इन पब्लिक न्यूजची खातरजमा अन जाहिरातीत बदल…

याबाबत तात्काळ इन पब्लिक न्यूजने खातरजमा केली. यानंतर अशी माहिती मिळाली की एसटी बसेस संदर्भात प्राथमिक स्वरूपात मिळालेल्या माहितीनुसार आणि घाई गडबडीत झालेली ती एक चूक आहे अशी कार्यकर्त्यानी इन पब्लिक न्यूजशी बोलताना माहिती दिली.

ज्येष्ठ नागरिक म्हणाले…

दरम्यान, छोट्या मोठ्या कार्यक्रमात ते नेहमीच बोलतात की आपण तीन चार नेते एकत्र येऊनच  विकास करूया यामुळेच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे आमदार असून देखील त्यांना इतर विरोधी पक्षाची मदत घेणे गरजेचे वाटते का असा सवाल उपस्थित होतो? माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या काळात प्रचंड निधी तालुक्याला आला परंतु त्यांनी विरोधी पक्षाची मदत घेताना दिसून आले नाही? राजकारण वेगळे आणि विकास वेगळा असे सांगणारे नेते यांनी खरंच विकास केलाय का असा सवाल शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केला?

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला In Public News; आवाज सर्वसामान्यांचा  फॉलो करा

राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button