
सांगोला : कोणतीही तांत्रिक व आर्थिक माहिती न देता अचानकपणे(Shaktipeeth Highway) शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणीची नोटीस देण्यात आली असून ही बेकायदेशीर व अन्यायकारक मोजणी तात्काळ थांबवावी अन्यथा येणाऱ्या आषाढीवारी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांपासून गोळा केलेली चिल्लर पैसे आणि कवड्या उधळणार असल्याचा इशारा किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम (Shaktipeeth Highway) यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.
सदर बेकायदेशीर मोजणी (Shaktipeeth Highway) तत्काळ रद्द अथवा स्थगित करून लोकांना विश्वासात घेऊन, कायद्याचे व आय. आर. सी चे सर्व नॉर्म व नियम व अटी पालन करून पुढील कार्यवाही योग्य पद्धतीने करावी व शेतकऱ्यावर अन्याय करू नये अशी मागणी त्यांनी निवेदनामध्ये केली आहे. (Shaktipeeth Highway)
महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम 8 नुसार शेतकऱ्यांना कोणताही नकाशा, संरेखन दाखवण्यात आलेले नाही. महत्वाचे म्हणजे आमच्या जमिनीला नेमका दर किती व कसा मिळणार हे सुद्धा सांगितलेले नाही. हा सर्व प्रकार अत्यंत बेकायदेशीर, अन्यायकारक आणि उघड संशयास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.शक्तीपीठ हा विकासाच्या नावावर पैसे खाण्याचा प्रकल्प आहे.विकासाच्या नावावर शेतकऱ्याची जमीन कवडी मोलाने घेऊन भांडवलदारांच्या घशात पैसा घालण्याचा हा प्रकार आहे. म्हणून आम्ही चिल्लर पैसे आणि कवड्या मुख्यमंत्र्यांसमोर उधळणार आहोत असे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.
सांगोला तहसीलचे प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रकाश सोळसे, चंद्रकांत चौगुले, निलेश हागिर, अमोल खरात ,भालचंद्र येलपले, भारत सोळशे, तेजस कोकरे, आनंदा मेटकरी, तानाजी कवठेकर, बाळासाहेब कोकरे राहुल शेंबडे आदीसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.