
विशेष प्रतिनिधी : सांगोला एस.टी. आगाराला नवीन पाच बस मिळाल्याचा लोकार्पण मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते दिमाखात पार पडला. प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या नव्या बसेस अत्यंत गरजेच्या होत्या. ही गरज ओळखून मा. आमदार शहाजी बापूंनी यांनी वेळोवेळी एस.टी. महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश येत, सांगोला आगाराला पहिल्या टप्प्यात पाच बस प्राप्त झाल्या.
दरम्यान, तालुक्यातील विकास कामावर श्रेय घेण्याताना सर्वच नेते पुढाकार घेत आहेत. परंतु येणाऱ्या काळात मंत्री पदाची शपथ घेणाऱ्या मा. आमदार बापूंनी श्रेय वादावर बोलताना चिमटा काढला.
बसेसच्या मंजुरीबाबत बोलताना बापू म्हणाले, या बसेसची मागणी मी आमदारकीच्या काळात केली होती. परंतु त्याचे श्रेय घेण्याची गरज वाटत नाही. या बसेस आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या काळात आल्या, म्हणजे सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शक्य झाले. कोणी एकटा काही करू शकत नाही. डॉ.बाबासाहेब हे माझ्या मुलासारखे आहेत. त्यांच्या कामांना माझा पाठिंबा आहे.
ते पुढे म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नये. हे काम जनतेसाठी आहे, कुणी श्रेय घ्यावं म्हणून नाही.” बापूंनी सांगितलं मी आमदार असो नसो जनतेसाठी सदैव सोबत राहील सांगोला तालुक्याच्या विकासासाठी माझ्याकडे कधीही कोणीही या मी ते करेल असा शब्द त्यांनी दिला.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!