‘ढाण्या वाघ’ मा.शाहाजी बापू पाटील यांचे निवडणुकीत दणदणीत शक्तिप्रदर्शन!
स्वप्नील करडे : सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत यावेळी राजकारणाने वेगळीच वळणं घेतली आहेत. अनेक पक्ष आणि आघाड्यांमध्ये तडजोडी, युती आणि अंतर्गत मतभेद सुरू असतानाच एका प्रमुख पक्ष शिवसेनेचे “ढाण्या वाघ” यांनीच सर्व प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे, या पक्षाचा पूर्ण पॅनल जाहीर झाल्याने सांगोल्यातील राजकीय समीकरणे अधिकच तापली आहेत.
शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र उमेदवार देत एक मजबूत आणि शिस्तबद्ध पॅनल शहरवासीयांसमोर सादर करण्यात आला आहे. यामुळे हा पक्ष एकमेव असा ठरतो आहे की ज्याने कोणतीही युती न करता, सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विश्वासार्ह निर्णय घेतला आहे. याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून “थेट जनता दरबारात” जाण्याचा हा प्रयत्न आहे.
सध्या शहरात या “संपूर्ण पॅनल”ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, इतर पक्षांवर देखील दबाव निर्माण झाल्याचे दिसते. काही पक्षांनी अद्याप सर्व जागांचे उमेदवार जाहीर न केल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आहे, मात्र या पक्षाने पहिल्याच टप्प्यात पूर्ण तयारीने मैदानात उतरत आपली आघाडी स्पष्ट केली आहे.
शहरातील मतदारांमध्येही दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काहीजण “संपूर्ण पॅनल म्हणजे स्थिरता आणि ताकद” असे मानत आहेत, तर काहीजण व्यक्तीगत कामगिरी आणि स्थानिक प्रश्नांवर मत ठरवणार असल्याचे सांगत आहेत.
आगामी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत यावेळी फक्त ढाण्या वाघ शैलीत सर्व प्रभागात उमेदवार देणारा हा पक्षच संपूर्ण मैदानात उतरलेला दिसून येत असून, त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होणार हे नक्की.

