Big Braking : प्रेमाच्या नावाखाली लैंगिक अत्याचार, गर्भपात; माजी नगरसेविकेच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
पीडित तरुणीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे

पुणे/प्रतिनिधी : प्रेमसंबंधाचे नाटक करून लैंगिक अत्याचार आणि नंतर गर्भपात करण्याच्या प्रकरणात एका तरुणाविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा माजी नगरसेविकेचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये एका व्यायामशाळेत आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख झाली. व्यवसाय करणाऱ्या तरुणीशी सुरुवातीला मैत्री केली आणि त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर जेव्हा तरुणीने विवाहाची मागणी केली, तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. संशय आल्याने तिने यासंदर्भात त्याला जाब विचारला असता, आरोपीने तिच्याशी गैरवर्तणूक केली, शिवीगाळ आणि मारहाण केली. पीडित तरुणीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.