महसूल विषयक प्रकरणांचा लोकअदालतीत निपटारा, नागरिकांना मोठा दिलासा
प्रथमच अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात महसूल प्रकरणांसाठी लोकअदालतीचे आयोजन

सोलापूर: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या सूचनेनुसार महसूल विषयक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी जिल्ह्यात विविध स्तरांवर लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी स्तरावर प्रथमच लोकअदालतीचे आयोजन
प्रथमच अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात महसूल प्रकरणांसाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. तसेच, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार न्यायालयांमध्येही अशा अदालती घेण्यात आल्या.
पक्षकारांमध्ये सामंजस्याने तडजोड; प्रकरणे निकाली
लोकअदालतीमध्ये पक्षकारांमधील तडजोडीच्या माध्यमातून काही महसूल प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे न्याय मिळण्यास गती मिळाली असून, नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत झाली.
सोलापूर विभागीय हातमाग कापड स्पर्धा संपन्न
लोकअदालतीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
या विशेष उपक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्यातर्फे सहाय्यक लोकअभिरक्षक आर. एस. पाटील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी वर्धमान वसगडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी दिली.
नागरिकांनी लोकअदालतीचा लाभ घ्यावा – अपर जिल्हाधिकारी
नागरिकांच्या आर्थिक आणि वेळेच्या बचतीसाठी तसेच परस्पर सामंजस्यातून वाद मिटवण्यासाठी लोकअदालती महत्त्वाच्या आहेत. यापुढे आयोजित होणाऱ्या लोकअदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी व्हावे,”असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केले.