रोहित हेगडे : सांगोला शहरात डॉक्टर धनंजय गावडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरूच आहे. दरम्यान पुढील तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आल्याची माहिती मिळत आहे. सर्व ‘पैशाच्या हव्यासापोटी’ लोकांना लुटून प्रशासनाला फसवण्याचे प्रकार याचेकडून सुरु?
डॉ. गावडे यांच्याविरोधात पुढे येत असलेल्या तक्रारींमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी थेट अनुभव सांगत गंभीर आरोप केल्याने हा विषय आता सार्वजनिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे?
“रुग्णांना लुटून प्रशासनाची फसवणूक?” : सर्वत्र खळबळ
या आरोपांमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावर देखील या विषयावर चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांमध्ये “आरोग्य सेवा म्हणजे सेवा की व्यवसाय?” असा सवाल उभा राहिल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, प्रशासनाची फसवणूक करत अत्यावश्यक माहिती देणे बंधनकारक असताना माहिती दिली जात नसल्याने अनेक बाबींना सामोरे जावे लागत आहे. ?
विशेष म्हणजे, “पैशाच्या हव्यासापोटी रुग्णांना लुटून प्रशासनाची दिशाभूल करण्यात येत आहे” असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला डॉ.गावडे हॉस्पिटलची चौकशी करून तात्काळ हे हॉस्पिटल बंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे. यानंतर संपूर्ण तालुक्याचे प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
भाग 3 : अर्रर्रर्रsss आपत्कालीन सेवेत “डायव्हर्शन रॅकेट” चालवतय सद्गुरु हॉस्पिटल?
