महाराष्ट्रदेश- विदेश

खळबळजनक! हत्या अन् मृतदेहाची विल्हेवाट, तीन आरोपी गजाआड


मुंबई / प्रतिनिधी: मालवणी परिसरातून बेपत्ता झालेला सराईत गुंडची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात भायखळा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक करून चौकशी केली असता त्यांनी खळबळजनक माहिती उघड केली.

हत्या अन् मृतदेहाची विल्हेवाट
१७ एप्रिलपासून बेपत्ता असलेला गुंड याचा मृतदेह मार्वे रोडजवळील नाल्यात फेकल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींनी आधी गुंडाची हत्या केली व नंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नाल्यात फेकला.

विनयभंगाचा संताप… आणि हत्या!
गुंडाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. त्यामुळे संतापलेल्या पीडित मुलीच्या भावाने दोन मित्रांच्या मदतीने ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. भायखळा पोलिसांनी तिघांना अटक करून मालवणी पोलिसांच्या ताब्यात दिले असून गुंडाचा मृतदेहाचा शोध पोलीस पथक घेत आहेत. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button