
विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरात दोन स्कूल बस (School Bus) अपघात झाला आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातानंतर समोर आलेले निष्काळजीपणाचे चित्र आणि शाळा प्रशासनाची “आमचा काही संबंध नाही” अशी भूमिका पालकांच्या संतापाचे कारण ठरत आहे. (School Bus)
अपघातग्रस्त बसची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थीぎ詰め करून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. बसमध्ये वैद्यकीय सुविधा नाहीत, सहाय्यक नाहीत, बस चालकांची पार्श्वभूमी अज्ञात, तरीही वार्षिक फी आकारली जात आहे. केवळ पैशासाठी मुलांच्या जीवाशी खेळ चालला आहे का, असा सडेतोड सवाल पालकांनी उपस्थित केला. (School Bus)
पालकांची तक्रार, शाळेचे दुर्लक्ष?
अनेक वेळा पालकांनी तक्रारी करूनही शाळा प्रशासन व बस चालकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात आले. “देशाचे भविष्य असणाऱ्या चिमुकल्यांची अशी निष्काळजीपणाने हेटाळणी करणे अमान्य आहे”, असा रोष पालकांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना व्यक्त केला.
इन पब्लिक न्यूजचा थेट प्राचार्यांना सवाल! आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त…
अपघातानंतर इन पब्लिक न्यूजने संबंधित शाळेच्या प्राचार्यांशी थेट संवाद साधला, तेव्हा त्यांनी सुरुवातीला “आमचा बसशी काही संबंध नाही, चालक कोण आहे माहीत नाही, आमचे काहीही देन घेण नाही, जुने कागदपत्रे ठेऊन त्यावर तारीख वार व इतर माहित नाही” असे सांगत व दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करण्यात आला. (School Bus)
दरम्यान, इन पब्लिक न्यूजने त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिल्यानंतर प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत, पुढे अशा घटना घडणार नाहीत, बस चालकांची माहिती व कागदपत्रे शाळेत ठेवण्यात येतील, नवीन नियम बनवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदारी घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
पालकांना काय अपेक्षित?
सांगोला शहरातील या घटनेने शाळांतील बस व्यवस्थापन, सुरक्षितता आणि जबाबदारी या मुद्द्यांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. संबंधित शाळांवर प्रशासनाने तत्काळ कारवाई करून, सर्व शाळांमध्ये सुरक्षेचे एकसंध नियम लागू करणे, ही काळाची गरज आहे.(School Bus)