“सारथी”ची प्रतीकात्मक तंबाखू व्यसनाची होळी !
दुष्ट पदार्थांना अर्थात व्यसनांना आपण समाजातून हद्दपार करूया

सोलापूर/गुरुनाथ ताटे : होळी सणाच्या दिवशी वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टीला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला जातो याच हेतूने सारखी युथ फाउंडेशन च्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही प्रतिकात्मक तंबाखू व्यसनाची होळी याही वर्षी बनविण्यात आली. कामगार वसाहतीतील युवक युवतींना सोबत घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रतीकात्मक व्यसनांची होळी करण्यात आली. होळी मध्ये व्यसन नष्ट करुन व्यसनमुक्त समाज तयार करण्यासाठी हि युवा पिढी कार्य करत आहे.
Happy Holi 2025 : देशभरात होळीचा उत्साह, जाणून घ्या कशी झाली सुरुवात
सारथी युथ फाऊंडेशन सोलापूर ही संस्था पंधरा वर्षांपासून तंबाखू व्यसनमुक्ती हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करते आहे. यावेळी तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटखा, मावा, मशेरी अशा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची नावे कागदावर लिहून पदार्थांच्या नावाची होळी करून या दुष्ट पदार्थांना अर्थात व्यसनांना आपण समाजातून हद्दपार करूया असा समाजाला संदेश दिला.
संस्कृती आणि उद्दिष्ट यामध्ये अशा अभिनव उपक्रमाचा पूल बांधणे आता गरजेचे झालेले आहे असे उद्गार संस्थेचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी यानिमित्ताने काढले. या प्रसंगी संस्थेचे कोअर कमिटी सदस्य प्रसाद अतनूरकर, समन्वयक गुरुनाथ ताटे आणि स्वयंसेवक यांनी आसपासच्या कचरा गोळा करून त्याचीच होळी करून परिसर
स्वच्छतेचा संदेश पसरवला हे आणखीन विशेष. हा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी आणि बाळगोपाळांनी गर्दी केली होती.