शैक्षणिकदेश- विदेश

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये कु.संकृती लोंढे प्रथम

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा


सांगोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ ,मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये कु.संस्कृती संतोष लोंढे (सांगोला जि. सोलापूर) हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे . ती येथील सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये सातवीत शिक्षण घेत आहे, त्यामुळे या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवराचेकडून तिचे अभिनंदन होत आहे.

बालपणा पासूनच वक्तृत्वाची आवड असणाऱ्या संस्कृतीने यापूर्वी अनेक स्पर्धा गाजवत यश संपादन केले आहे. राज्य मुख्याध्यापक महामंडळाचेवतीने या वर्षीच्या इयत्ता पाचवी ते सातवी गटातील विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा २० मार्च रोजी आभासी पद्धतीने घेण्यात आल्या . या राजस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

कु.संस्कृतीने सोलापूर जिह्याचे प्रतिनिधीत्व केले. ‘निसर्गाप्रती माझे कर्तव्य’ या विषयावर तिने आपली अभ्यासपूर्ण मांडणी केली.

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.पी.सी.झपके , विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने ( सर ), या स्पर्धेचे समन्वयक मुख्याध्यापक संजयकुमार झांबरे ( सर),सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत ( अकोला ),डॉ.जतीनकूमार मेढे(जळगाव), एन.एम.पाटील सर, गुळमिरे सर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले ,प्राचार्य डॉ.मधुसुधन बचुटे ,युवा वक्त्या अलिशा मोहिते( सांगली),विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे (चिपळूण )पोलीस उपनिरीक्षक अक्षय वाघमारे(मुंबई) ,बँक व्यवस्थापक विशाल शिंदे ,उपमुख्यापक शाहिदा सय्यद मॅडम ,पर्वेक्षक मच्छिद्र इंगोले (सर) पर्वेक्षक सुरेश मुस्तूद ( सर ), पर्वेक्षक प्रदीप दुकटे (सर ) यांनी तिचे अभिनंदन केले.

तिच्या या यशामध्ये वाड्मय मंडळाचे प्रमुख उन्मेष आटपाडीकर (सर ) , उमेश नष्टे (सर) , सौ मनीषा पांडे मॅडम , वर्गशिक्षिका रोहिणी शिंदे मॅडम ,सौ. संध्या तेली मॅडम ,वैभव कोठवळे( सर ), डी. एस.पाटील ( सर ) , आर. डी. ढोले (सर ) , प्रशांत रायचुरे( सर ) ,अमोल माहिमकर( सर ) ,अजिंक्य झपके( सर ) , श्रीकृष्ण वाघमारे(सर ) , डॉ.नवनाथ शिंदे,डॉ.विजयकुमार गाडेकर ,प्रा. प्रसाद लोखंडे, दिनकर कांबळे , शिवाजी खडतरे, वडील प्रा.संतोष लोंढे ,आई अर्चना लोंढे ,कु.सृष्टी शिंदे ,भगवंत कोळी , राजवीर लोंढे शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button