शैक्षणिक

Maharashtra Board Result 2025: दहावी-बारावीचा निकाल या महिन्यात जाहीर होणार


पुणे : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच 10वी व 12वीच्या परीक्षा निकालांची घोषणा करणार आहे.

विद्यार्थी आणि पालक यांची सध्या सर्वात मोठी उत्सुकता 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बारावीचा निकाल मे 2025 च्या तिसऱ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या तारखा (अपेक्षित)

१२वीचा निकाल: मे 2025 – तिसरा आठवडा

१०वीचा निकाल: मे 2025 – शेवटचा आठवडा

निकाल कुठे पाहता येईल?*

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाइट्सवर आपला रोल नंबर व जन्मतारीख टाकून निकाल पाहू शकतील:

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

वेबसाइट स्लो होण्याच्या तक्रारी यंदा कमी होणार!

दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाइटवर प्रचंड ट्रॅफिक झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडथळे येतात. यंदा हे टाळण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाइटची क्षमता वाढवण्याचे तसेच सायबर सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्यांचा तणाव वाढतोय! निकालाच्या अपेक्षेने अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत असून, अनेकांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरणे सुरू केले आहे. त्यामुळे निकाल वेळेत आणि सुरळीत लागणे अत्यंत गरजेचे ठरत आहे.

विद्यार्थ्यांनो, निकालाच्या घोषणेसाठी सज्ज राहा;  मेहनतीचे फळ लवकरच मिळणार आहे!


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button