सांगोला आगाराला तातडीने २० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात : विकास पोपळे,आगार व्यवस्थापक
२०१८-१९ मध्ये सांगोला आगारात ७२ बसेस होत्या जानेवारी २०२५ पर्यंत संख्या घटून ५३ झालेत

सांगोला/विशेष प्रतिनिधी : सांगोला आगारातील बस कमी होत चालल्याने प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. २०१८-१९ मध्ये सांगोला आगारात ७२ बसेस होत्या. मात्र, जानेवारी २०२५ पर्यंत ही संख्या घटून ५३ वर आली आहे. त्यातील काही बसेस नियमित देखभाल, आरटीओ कामे आणि अन्य कारणांमुळे वाहतुकीसाठी उपलब्ध नसतात. परिणामी, दररोज प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीसाठी फक्त ४० बस उपलब्ध असतात.
सध्या कार्यरत बसेसचे सरासरी आयुर्मान साडेतेरा वर्षांपेक्षा अधिक असून, त्या १४ लाख किमी अंतर पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे बसेस वारंवार बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, नियोजित वेळेत सेवा देण्यास अडचणी निर्माण होत असून, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विदयार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये अंगिकृत करावे : प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले
बस कमतरतेमुळे अनेक महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही लांबपल्ल्याच्या, मध्यम अंतराच्या आणि ग्रामीण भागातील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवाव्या लागल्या आहेत. यामुळे प्रवासीवर्गामध्ये नाराजी पसरली असून, वारंवार तक्रारी नोंदवल्या जात आहेत.
सध्या उपलब्ध असलेल्या ५३ बसेसमधून १० बसेस यंदा (२०२५) स्क्रॅप करण्यात येणार असल्याने आगारातील बससंख्या केवळ ४३ वर येईल. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक बससंख्या आणखी घटणार आहे. या परिस्थितीवर तोडगा म्हणून सांगोला आगाराला तातडीने २० नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आगार व्यवस्थापक विकास पोपळे यांनी केली आहे.