सांगोला : सांगोला पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आठवडा बाजार परिसरात शिताफीने सापळा रचत सराईत जनावर चोरी प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून जनावरे व वाहन असा एकूण ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपी :
१) शेखर महादेव चव्हाण (वय ३०, रा. चर वस्ती, माळीनगर, ता. माळशिरस)
२) गोविंद संनू काळे (वय २३, रा. सवतगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर)
३) प्रवीण विजय चव्हाण (वय २०, रा. सवतगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर)
जप्त मुद्देमाल :
१ बोकड व १३ शेळ्या, किंमत १,४०,०००/- महिंद्रा छोटा हत्ती (एमएच-४५ एएफ २४०७), किंमत ३,५०,०००/- एकूण किंमत : ४,९०,०००/- अशी माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, यांच्यासह पोहेकॉ काझी, सावंत, राजगे, पो.कॉ. पाटील, पांढरे, माळी, चव्हाण, नदाफ आदींनी केली. सांगोला पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जनावर चोरी प्रकरणातील महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले.
