सांगोला पोलिसांची कडक कारवाई! २० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहरात वाहतुकीच्या वाढत्या समस्या आणि अपघाताच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सांगोला पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये लहान मुले आणि रायडर, मोठ्या आवाजाच्या बुलेट गाड्या, लायसन्स व इतर आवश्यक कागदपत्रांची अनुपस्थिती यामुळे करवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरातील गर्दीच्या ठिकाणी लहान मुले व रायडर सुसाट वेगाने गाडीवर जातात. गेल्या काही दिवसात अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. यावर कारवाई करणे गरजेचे होते अशी मागणी नागरिकांतून केली जात होती.
सांगोला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक म्हणून विनोद घुगे यांनी पदभार स्वीकारला आणि वाहतुकीच्या प्रश्नावर त्यांनी नजर टाकत कारवायांचा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी बडगा उचलला. त्यांच्याकडून शहरातील वाहतूक प्रश्नावर दररोज कारवाया केल्या जात आहेत.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे : पोलीस निरीक्षक विनोद घुगे
नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर दंड हा त्यांच्यावर आकारला जाणार नाही. परंतु जे नियम पाहणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आज शहरात लहान मुले, काही रायडर्स यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यांना आळा घालणे गरजेचे आहे. असे पो.नि. विनोद घुगे यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना माहिती दिली.
२० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल : वाहतूक विभागाचे नितीन घुले
वाहतूक विभागाचे नितीन घुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ रोजी वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी २० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण होत असून, नागरिकांमध्ये नियम पाळण्याची जाणीव वाढत असल्याची माहिती नितीन घुले यांनी इन पब्लिक न्यूजला दिली.