Breaking News: सांगोला पोलिसांची मोठी कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ३ वाहनांवर धाड, ८.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पो.नि.विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली धाडसत्र राबवण्यात आले

सांगोला/महेश लांडगे : सांगोला पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ८.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी धाडसत्र राबवण्यात आले. ही कारवाई ११ व १२ मे २०२५ रोजी मौजे आलेगाव व महुद येथे करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला पोलिसांनी मौजे आलेगावमधील कोरड्या नदीपात्रातून आणि महुद येथील सरकारी विहिरीजवळील बंधाऱ्यातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार पोलिसांनी खालील तीन वाहने जप्त केली:
- करण शामराव जाधव (रा. टकले वस्ती) – टाटा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे एन्ट्रा वाहन
- सुरज रामहरी धोत्रे (रा. चिकमहुद) – एमएच १० बीआर ४१२७ क्रमांकाचे वाहन
- एक अज्ञात चालक – एमएच १३ एएन ७६१९ क्रमांकाचे वाहन
सदर वाहनांमधून शासनाची रॉयल्टी न भरता विना परवाना ३ ब्रास वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात होती. पोलिसांनी सर्व वाहने व वाळू जप्त करून सांगोला पोलीस ठाण्यात आणली. एकूण मुद्देमालाची किंमत ८.२४,०००/- रुपये इतकी आहे.
याप्रकरणी पो.कॉ. सदाम नदाफ व पो.कॉ. मारुती पांढरे यांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत पोसई हणमंत हिप्परकर, पोहेकॉ अस्मल काझी, पोहकॉ दत्ता वजाळे, पोकॉ संजय कांबळे, पोकॉ मारुती पांढरे सहभागी होते.
पुढील तपास सुरू असून अवैध वाळू माफियांवर पोलिसांकडून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.