सांगोला/प्रतिनिधी : सांगोला पोलिसांनी कर्तव्यदक्षतेमुळे मारहाण करून जबरदस्तीने सोने लंपास करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सांगोला पोलिस ठाण्यात गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपी योगराज संजय मोहटकर वय 24 राहणार ठी बुध ता खटाव जी सातारा याने महिलेवर हल्ला करून तिच्या गळ्यातील सोने जबरदस्तीने हिसकावून नेले होते. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेतला आणि अखेर त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.
या कारवाईचे मार्गदर्शन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा विभाग बसवसज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद घुगे, पोलिस उपनिरीक्षक भारत वाघे, हवालदार ढेरे पोलिस नाईक लेंगरे आणि सायबर सेलचे तांबोळी यांनी केली.
सांगोला पोलिस ठाण्याच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक नागरिकांकडून पोलिस दलाचे आभार मानण्यात येत आहेत.
