
सांगोला /महेश लांडगे : महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी आज आमदार दिपक (आबा) साळुंखे-पाटील यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विविध विकासकामांवर चर्चा झाली.
या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक विकास प्रकल्प, विधार्थी कल्याण, आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच, स्थानिक जनतेच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी आम. दिपक (आबा) साळुंखे-पाटील यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वागत करत त्यांचे आभार मानले आणि सरकारच्या मदतीने स्थानिक पातळीवर विकासकामे वेगाने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी शिवाजीराव गायकवाड, मधुकर बनसोडे,आलमगीर मुल्ला, योगेश खटकाळे ,सतीश काशीद ,विनोद रणदिवे, आनंदा माने ,बिरा पुकळे, नवनाथ पवार, शिवाजी चव्हाण, विजय पवार, सुनील गायकवाड, विनायक मिसाळ ,अक्षय महामुनी, अरविंद केदार, शाहू मेटकरी, नवनाथ इंगोले,दादासो इंगोले, विकास जाधव, महादेव शिंदे, आप्पासाहेब साळुंखे, अजहर मुल्ला, चंचल बनसोडे, विनायक लोखंडे ,अनिल दिघे, प्रवीण घाडगे, किरण खंडागळे, संतोष खडतरे, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.