
सांगोला / विशेष प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर, सांगोला महाविद्यालय सांगोला व ग्रामपंचायत मेडशिंगी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर मौजे मेडशिंगी येथे दि.२५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न झाले. विद्यार्थ्यावर श्रम संस्कार व्हावेत त्यांच्यामध्ये सामजिक बांधिलकी ची भावना विकसित व्हावी या उद्देशाने हे शिबीर आयोजित केली जाते.
या वर्षी ‘युथ फॉर माय भारत व डिजिटल साक्षरते साठी युवक’ ही थीम घेवून हे शिबीर आयोजित करण्यात आले. या सात दिवसीय निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदाना बरोबर मेडशिंगी गावाचे ऐतिहासिक सर्वेक्षण, तसेच समाज प्रबोधनपर कार्यक्रमात सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन सांगोल्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. विजय इंगवले यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थान सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ सांगोला चे अध्यक्ष मा.बाबुरावजी गायकवाड यांनी भूषविले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मा. अॅड.उदय(बापू) घोंगडे. मेडशिंगी च्या सरपंच सौ.उमा इंगवले, उपसरपंच बाळासाहेब लेंडवे, श्री प्रतापसिंह इंगवले, श्री.अमर गोडसे, प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले आदि मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम सरपंच सौ.उमा इंगवले यांनी आपल्या गावामध्ये शिबिरार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिबीर काळात भरीव काम करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. विजय इंगवले यांनी जीवनात श्रमाचे महत्व पटवून दिले तर संस्था उपाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी श्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. बाबुराव गायकवाड यांनी विद्यार्थाना आवाहन केले की,त्यांनी चांगले काम करून गावातील लोकांच्या मनात आपणा साठी जागा निर्माण करावी.
या शिबिरा मध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानांतर्गत ग्रामस्वच्छता, जिल्हा परिषद केंद्र शाळा परिसर स्वच्छता, गावतील मारीआई मंदिर परिसर स्वच्छता, हनुमान मंदिर परिसर स्वच्छता, गावातील मुख्य रस्ता स्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, प्राथमिक आरोग्य केंद्र स्वच्छता, तसेच अप्रूपा नदीवर पूल व रस्ता तयार करण्याचे काम केले . प्रबोधनपरक कार्यक्रमातर्गत २६ जानेवारी रोजी ‘डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षा’ या विषयावर श्री. किरण सावंत व प्रा गणेश पैलवान यांचे व्याख्यान संपन्न झाले. २७ जानेवारी रोजी ‘हवामान बदल व शेतीपुढील आव्हाने’ या विषयावर श्रीकांत सोनावणे व डॉ अमोल पवार यांनी मार्गदर्शन केले. २८ जानेवारी रोजी ‘महिला मेळावा व महिलांचे आर्थिक स्वावलंबन’ या विषयावर मा. अॅड. राजेश्वरी केदार व कल्पनाताई शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले. संध्याकाळी नागन्नाथ साळवे यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला.
२९ जानेवारी रोजी व्यसनमुक्त युवक या विषयावर प्रा. समाधान काळे यांनी तर स्पर्धा परीक्षा या विषयावर सांगोल्याचे तहसिलदार संतोष कणसे यांनी मार्गदर्शन केले.३० जानेवारी रोजी जलसाक्षरता या विषयावरती मा. श्री. वैजिनाथ घोंगडे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमासाठी डॉ रमेश टेंभुर्णे, डॉ महेश घाडगे, प्रा . वासुदेव वलेकर, प्रा डॉ चित्रा जांभळे, प्रा. सोनल भुंजे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ . भारत पवार, प्रा . संतोष लोंढे, डॉ. मालोजी जगताप, डॉ विद्या जाधव, डॉ.तानाजी यादव, प्रा. रोहित पवार, डॉ भाग्यश्री पाटील, प्रा. प्रज्ञा गायकवाड, प्रा. डॉ जमीर तांबोळी व प्रा विकास उबाळे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या विशेष श्रम संस्कार शिबिराचा समारोप ३१ जानेवारी रोजी झाला.
या कार्यक्राची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या समारंभाचे प्रमुख पाहुणे सांगोला नगरीचे मुखाधिकारी मा डॉ .सुधीर गवळी हे होते त्यांनी विद्यार्थ्यांनी या सात दिवसात केलेल्या कामाची पाहणी करून केलेल्या कामाचे कौतुक केले . या प्रसंगी मा. अॅड. गजानन भाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन व देशप्रेम या विषयी मार्गदर्शन केले. मा. श्री. जगनाथ भगत गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व पटवून दिले.
सरपंच सौ. उमा इंगवले यांनी विद्यार्थांना आवाहन केले कि त्यांनी भविष्यात अशीच श्रम साधना करावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव मा. अॅड.उदय(बापू) घोंगडे यांनी जीवना मध्ये यशश्वी होण्यासाठी श्रम साधनेचे अनन्य साधारण महत्व विविध उदाहरणाच्या माधमातून पटवून दिले. या प्रसंगी महाविद्यालायचे प्रोफेसर डॉ. अर्जुन मासाळ, श्री. प्रतापसिंह इंगवले, श्री प्रभाकर कसबे गुरुजी व विद्यार्थ्यांची मनोगते झाली तसेच शिबीर कालखंडात विद्यार्थ्यासाठी अन्नदान करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर रामलिंग झाडबुके, सुनील शिंदे गुरुजी, डॉ दत्तात्रय साळुंखे, मधुकर बनसोडे, नितीन इंगोले, व ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरा साठी प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ राम पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे व डॉ. सदाशिव देवकर तसेच शिक्षेकेतर कर्मचारी श्री महादेव काशीद यांनी या शिबिराचे संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्याचा परिचय डॉ. नवनाथ शिंदे यांनी करून दिला .अहवाल वाचन व आभार डॉ. सदाशिव देवकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. विकास उबाळे यांनी केले.