
सांगोला/रोहित हेगडे : सांगोला शहरात आज सकाळी ६ च्या सुमारास खडतरे गल्ली येथे एक भले मोठे यंत्र, पॅराशुट अचानकपणे कोसळले. या कोसळण्याचा आवाज प्रचंड मोठा होता. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. या यंत्रातून काही रासायनिक द्रव्यांचा वास येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हे नक्की यंत्र कशाचे आहे? बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.


याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे यंत्र काल हैदराबाद येथून टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल या कंपनीचे आहे. काही चाचणी करिता पॅराशुटच्या मदतीने हवेत हे यंत्र सोडण्यात आले होते. अचानक यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खारवटवाडी येथे पॅराशुट आणि शहरातील खडतरे गल्ली येथे हे येऊन एका गाडीवर आढळले. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अत्यंत सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.
हे यंत्र नक्की कशाचे आहे हे पाहण्यासाठी नागरिकानी मोठी गर्दी करण्यात केली. यावेळी पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करून गर्दी हटवली.
