सांगोला : सांगोला विधीज्ञ संघाच्या सन 2026-27 सालाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. विशालदिप विजयसिंह बाबर यांची विक्रमी मताधिक्यांनी निवड झाली.
याशिवाय, उपाध्यक्षपदी अॅड. नवनाथ नामदेव खट्टे, सचिवपदी अॅड. शरद विलास साळुंखे, तर सहसचिवपदी अॅड. अनुष्का ज्ञानेश्वर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अशोक बाळासाहेब गव्हाणे यांनी जबाबदारी पार पाडली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. जालिंदर दत्तात्रय साळुंखे यांनी काम पाहिले. तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी अॅड. सुप्रिया विकास बोत्रे आणि अॅड. अमोल यशवंत जाधव यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाल्यानंतर सांगोला विधीज्ञ संघाच्या ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नवीन अध्यक्ष अॅड. विशालदिप बाबर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्व ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन संघाचे कामकाज पार पाडणार आहे. सर्वांना सोबत घेऊन संघ अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहील.” त्यांनी निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानत पुढील कार्यकाळासाठी सहकार्य व मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.
