महाराष्ट्रEconomy

पंढरीत १०३ कोटी ७९ लाख टेंडरला अखेर मंजुरी

लाखो वारकऱ्यांना सुलभ दर्शनाचा मार्ग होणार मोकळा


पंढरपूर/ विशेष प्रतिनिधी : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी स्कायवॉक आणि दर्शन मंडप उभारणीच्या १०३ कोटींच्या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही निविदा पूर्वी रद्द करण्यात आली होती, मात्र ती शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा प्रकाशित केली. यामुळे लाखो वारकऱ्यांना सुलभ दर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

राजकीय गोंधळानंतर अखेर टेंडरला मंजुरी

हा प्रकल्प माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला होता, तर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचा समावेश ‘शंभर दिवसांच्या कार्यक्रमात’ केला होता. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर अचानक रद्द केले होते, त्यामुळे या निर्णयावर जोरदार टीका झाली.

अविरत सेवेचा झरा “डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान”सांगोला यांच्यावतीने ‘स्वच्छता मोहीम’

राज्याच्या प्रशासनातील वरच्या स्तरावर यावर चर्चा सुरू झाल्यानंतर अखेर १०३ कोटी ७९ लाख रुपयांची नवी निविदा शनिवारी जाहीर करण्यात आली. मात्र, या निविदा आधीच मंजूर झाल्यानंतर ती रद्द का झाली? आणि कुणाच्या सांगण्यावरून हा निर्णय झाला? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता वारकरी संप्रदायाकडून होत आहे.

नेमका काय आहे प्रकल्प?

तिरुपतीच्या धर्तीवर दर्शनासाठी टोकन प्रणाली सुरू करून भाविकांना केवळ २ तासांत विठ्ठल दर्शन मिळावे, यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
गोपाळपूर येथे दर्शन मंडप उभारणी.
थेट विठ्ठल मंदिरापर्यंत स्कायवॉक बांधणी.
टीसीएस कंपनीकडून मोफत सॉफ्टवेअर सुविधा.

सध्या भाविकांना ३०-३० तास रांगेत उभे राहावे लागते, मात्र या योजनेमुळे दर्शन अधिक सोपे होईल.

आषाढी एकादशीला शुभारंभाचा प्रयत्न

हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करायचा आहे. यासाठी ७ एप्रिलला निविदा उघडली जाणार असून, येत्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.यापूर्वी टेंडर रद्द झाल्याने काम लांबणीवर पडले, पण आता पुन्हा एकदा भक्तांसाठी ‘विठुरायाचे दर्शन अवघ्या दोन तासांत’ हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे!


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button