मनोरंजन

समंथा प्रभूचा ‘हे’ करण्यास नकार अनं बसला कोट्यावधीचा फटका! पाहा काय आहे नेमकं प्रकरण


मुंबई : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री समांथा प्रभू नेहमीच चर्चेचा विषय असते. एका मुलाखतीत तिने ब्रँड निवडीबाबतचा एक दृष्टिकोन सांगितला.

समांथा म्हणाली, पूर्वी मी ज्या प्रकारे जाहिराती केल्या, त्या काळाच्या संदर्भात योग्य वाटत असतील, पण आता मला वाटतं की त्या जाहिरातींमुळे चुकीचा संदेश गेला असेल. त्यामुळे मी आता प्रत्येक ब्रँडच्या मागे काय संदेश आहे हे तपासते.

पुढे बोलताना ती म्हणाली, गेल्या वर्षी मी जवळपास १५ ब्रँड्सची जाहिरात नाकारली. यातून मला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला असला आहे. 

आजच्या तरुण प्रेक्षकांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी जागरूकता आणि जबाबदारीची भावना ही अत्यावश्यक आहे, आणि समांथा त्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ही भूमिका अभिनेत्रीच्या प्रामाणिकतेचा आणि सामाजिक जाणीवेचा परिचय देणारी ठरत आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button