भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन आणि संविधानाचे वाचन

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सोलापूर शहरात अभिवादन व संविधान वाचनाने साजरी करण्यात आली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार “सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत हा कार्यक्रम पार्क चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर बौद्ध वंदना करून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांना संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सहायक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण) मनीषा फुले, संशोधन अधिकारी (जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती) सचिन कवळे, विविध महामंडळांचे अधिकारी, प्रकल्प अधिकारी, समतादूत, वसतिगृहातील विद्यार्थी
तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन राजश्री कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाबाबतची माहिती सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सोलापूर श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी दिली.