
विशेष प्रतिनिधी : चिंचोली रोड परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत व्यवहारावर अद्यापही ठोस कारवाई न झाल्याने महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Raksha Bandhan) यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे यावर गप्प का आहे आहेत असा सवाल येथील महिलांनी केला आहे. (Raksha Bandhan)
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती असताना हा वेगळाच व्यापार केवळ कायद्याचे उल्लंघन नसून शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. परंतु महसूल व बाजार समिती विभाग निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. यांना मोठा मलिदा मिळाल्यामुळेच कारवाईला विलंब होतोय का? असा थेट सवाल नार्रीकांनी उपस्थित केला आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे यावर कारवाई करण्याचे आदेश का देत नाहीत? जर कारवाई झाली नाही तर नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणावर खुलासा करून कारवाई करावी, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबतील. स्थानिकांचा आरोप केला की, काही मोठ्या एजंट व व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. (Raksha Bandhan)