In Public News
पंढरपुर/शुभम चव्हाण : एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर व पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दि. १० ते १६ या सप्ताहात खेडभाळवणी, ता.पंढरपूर येथे विशेष श्रमसंस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे विभागीय समन्वयक डॉ.संजय मुजमुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, एन.एस.एस. चे कार्यक्रमअधिकारी प्रा.चंद्रकांत देशमुख, प्रा.सुमित इंगोले, प्रा.मासाळ, प्रा.अजित करांडे, प्रा.गुरुराज इनामदार तसेच खेडभाळवणी गावचे सरपंच डॉ.संतोष साळुंखे हे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबीरामध्ये दि. 10 ते 16 या कालावधीमध्ये डोळयाचे शिबीर, दंतचिकित्सा शिबीर, ग्रामस्वच्छता अभियान, महिला आरोग्य शिबीर आणि दुपारच्या सत्रात विविध विषयावर मान्यवर वक्त्यांचे व्याख्यान आयोजित केले असल्याची माहिती कार्यक्रमअधिकारी प्रा.चंद्रकांत देशमुख यांनी सांगीतली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमअधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा.सुमित इंगोले, प्रा.मासाळ, प्रा.अजित करांडे , प्रा.गुरुराज इनामदार व एन एस एस चे प्रेसिडेंट अथर्व कुराडे, सेक्रेटरी किशोर नरळे, नाना वाघमारे, सत्यम कापले, प्राप्ती रुपनर,तेजस्वी खांडेकर, अनुप नायकल, चेतन मासाळ, वैष्णवी पडगळ, आकांशा कवडे, सुमित अवताडे, आकाश चौगुले, प्राजक्ता डोंगरे यांनी परिश्रम घेतले.
