देश- विदेशमहाराष्ट्रसांगोला

नागरिकांची अडवणूक करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा गुलाब पुष्प देऊन अनोखा सत्कार! सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध!


सांगोला :  सांगोला तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक उमाकांत मोरे हे नियमितपणे नागरिकांची कामे न करता त्यांची अडवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष दत्ता सावंत यांनी अनोखा मार्ग अवलंबला. त्यांनी मोरे यांचा गुलाब पुष्प देऊन “सत्कार” करत निष्क्रियतेविरोधात आवाज उठवला.

या प्रसंगी बोलताना दत्ता सावंत म्हणाले, “सार्वजनिक प्रशासनात लोकांची कामे वेळेवर होणं गरजेचं आहे. मात्र येथे उलटं चित्र आहे. लोकांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत, तरीही त्यांची कामे प्रलंबित राहतात. हा प्रकार थांबायला हवा.”

या निषेधात्मक कृतीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, महसूल विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासन याकडे लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button