निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक, अव्वल कारकूनही अडकला ACBच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) विनोद खिरोळकर यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. शेतजमिनीच्या वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून २३ लाख रुपये आधीच घेतले होते. त्यानंतर पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती, त्यापैकी ५ लाख घेताना त्यांना अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत पकडण्यात आले.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत सरकारी अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ग्रामसेवकांपासून ते तहसीलदारांपर्यंत अनेकांना ACB ने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. अलीकडेच परभणी येथे एका महिला क्रीडा अधिकाऱ्यालाही लाच घेताना अटक झाली होती. आता छत्रपती संभाजीनगरमधील या प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!