शैक्षणिकमहाराष्ट्र

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक पदासाठी भरती

१२ मार्च २०२५ पुर्वी  जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज सादर करावेत


सोलापूर : सोलापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक-टंकलेखकाचे अशासकीय एक  पद मेस्को मार्फत भरावयाचे आहेत. जिल्हयातील पात्र माजी सैनिकांनी सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह बुधवार दिनांक 12 मार्च 2025 पुर्वी  जिल्हा सैनिक कार्यालयात अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद  तुंगार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या युध्द विधवा युध्दजन्य कारणाव्यतिरिक्त दिवंगत झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल. सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्या माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील. प्राप्त अर्जामधील उमेदवारांची बुधवार दिनांक 12 मार्च 2025  रोजी मुलाखती घेण्यात येतील.

सांगोला शहरातील एका शाळा-महाविद्यालयाचे गडबड-घोटाळे? सत्य येणार जनतेसमोर…!

सदर पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील. जिल्ह्यातील माजी सैनिक, युध्द विधवा, माजी सैनिकांच्या पत्नी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button