देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप १० बँका; RBI ने यादी जाहीर केली

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अनेक सहकारी व खाजगी बँका आर्थिक अडचणींमुळे बंद झाल्याचे आपण पाहिले आहे. अशा वेळी सुरक्षित बँकेची निवड करणे ही काळाची गरज बनली आहे. कधी गैरव्यवहार, तर कधी आर्थिक अडचणींमुळे अनेक बँकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहेत.
आरबीआयनेही काही बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे खातेदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. बँक बुडाल्यास ग्राहकांना डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत केवळ 5 लाख रुपयांपर्यंतच रक्कम मिळू शकते. त्यामुळे आता अनेकजण आपले पैसे सर्वाधिक सुरक्षित बँकांमध्ये ठेवण्याचा विचार करत आहेत.
आरबीआयने सांगितलेल्या देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 बँका:
1. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
2. HDFC बँक
3. ICICI बँक
4. पंजाब नॅशनल बँक (PNB)
5. बँक ऑफ बडोदा (BoB)
6. युनियन बँक ऑफ इंडिया
7. कॅनरा बँक
8. Axis बँक
9. इंडसइंड बँक
10. कोटक महिंद्रा बँक
या बँका त्यांची आर्थिक स्थैर्यता, NPA चे प्रमाण, ग्राहक सेवा आणि आरबीआयच्या नियमनाचे पालन या सर्व बाबतीत अत्यंत विश्वासार्ह मानल्या जातात. यामुळे तुमची गुंतवणूक या बँकांमध्ये अधिक सुरक्षित राहू शकते.