देश- विदेश
Trending

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात, २४२ प्रवाशांच्या मृत्यूची भीती!


Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून) दुपारी एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर ७८७ हे प्रवासी विमान अपघातग्रस्त झाले आहे. हे विमान लंडनला जाण्यासाठी टेकऑफ करत असताना एअरपोर्टच्या आवारातच क्रॅश झाले. (Ahmedabad Plane Crash )मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकायला आला आणि त्यानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसून आले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते आणि सर्वांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे.(Ahmedabad Plane Crash)

विमानाच्या पंखाचा तुकडा पडलेला, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरूAhmedabad Plane Crash

घटनेच्या स्थळी भीषण आगीचे लोट आणि काळ्या धुराचे लोट दूरवरूनही दिसत आहेत. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, ते आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. Ahmedabad Plane Crash विमानाचे एक पंख तुटलेले असून विमान पूर्णतः जळून खाक झाले आहे. विमान ज्या इमारतीला धडकले, ती इमारतही मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहे.Ahmedabad Plane Crash

सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर तातडीने कामावरAhmedabad Plane Crash

एअरपोर्टजवळ असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे.

घटनास्थळी अफवांचा व अफरातफरीचा माहौलAhmedabad Plane Crash

Ahmedabad Plane Crash या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात मोठी घबराट आणि अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी हा प्रसंग डोळ्याने पाहिल्याचे सांगत असून, लोक भयंकर भीतीने इधर-उधर पळताना दिसले.

अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या या विमानाच्या Ahmedabad Plane Crash अपघातामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. तपास यंत्रणा आणि नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने चौकशी सुरू केली आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button