
विशेष प्रतिनिधी : देशभरात राखी पौर्णिमा (Raksha Bandhan) उत्साहात साजरी केली जात आहे. आजचा हा दिवस भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतो.(Raksha Bandhan)
राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमेसोबत (Raksha Bandhan) विशेष महत्त्व आहे. यंदा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ९ ऑगस्टला असून सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ पर्यंत आहे, या शुभवेळेत राखी पौर्णिमा साजरा केल्यास लाभदायक मानले जाते.
अशी आहे राखी बांधण्याची पारंपरिक पद्धत :
थाळी सजवणे : थाळीत राखी, दिवा, अक्षता, मिठाई ठेवावी.
प्रार्थना : राखी बांधण्यापूर्वी सर्वांनी देवाची पूजा करून प्रार्थना करावी.
राखी बांधणे : भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधून ओवाळणी घेतली जाते.
वचन व आशीर्वाद : भाऊ हा बहिणीला भेट देतो व तिचे रक्षण करण्याचे वचन तिला देतो.
राखी पौर्णिमा केवळ सण नसून, तो एक भावनिक बंध जपणारा दिवस आहे. यात लहानसहान भांडणं, हसू, रुसवे-फुगवे विसरून भावंडं एकत्र येतात आणि नात्याचा गोडवा वाढवतात.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा संदेश :
“राखीच्या या शुभमुहूर्तावर, देव आयुष्यभर सुख-समाधान देवो!” (Raksha Bandhan)
“कधी भांडलो, कधी हसलो, कधी रुसलो.. पण एकत्र असल्यावरच झालो खरे सुखी! रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!”(Raksha Bandhan)