
सोलापुर/हेमा हिरासकर:महा एनजीओ फेडरेशन च्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 पुणे येथे आयोजित करण्यात आले.महाराष्ट्रातल्या एकूण 25 पुरस्कारार्थी पैकी सोलापूर च्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष कु. किरण नारायण माशाळकर यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य मंत्री श्री.शेखर मुंदडा व त्यांची पत्नी सौ.स्वाती ताई मुंदडा यांच्या हस्ते किरण माशाळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले.
Sunita Williams Return: सुनीता विल्यम्स यांची सुरक्षित घरवापसी, ७ मिनिटांचा ब्लॅकआऊट, १९०० डिग्री तापमान…
गेल्या 5 वर्षा पासून सामाजिक क्षेत्रात त्या उत्कृष्ट काम करत असताना कोरोना काळामध्ये जवळ पास 3000 कुटुंबांना धान्य ,भाजीपाला ,औषधे , सॅनिटायझर ,मास्क वाटप करण्यात आले.त्याच बरोबर बालविवाह करणाऱ्या वरती बंदी घालण्यात आली. मुलींचे संरक्षणासाठी कराटे व सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण घेण्यात आले.महिलांना शिवण,कला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात आले.महिला सक्षमीकरण,महिला सबलीकरण ,महिला आर्थिक विकास ,महिला बचत गट,महिला रोजगार, महिला उद्योजक,महिला संरक्षण ,महिलांच्या व युवतींच्या इतर सर्व समस्या सोडवण्या साठी ते तत्पर असतात.महिलांच्या व मुलींच्या हिता साठी त्या काम करतात.या कार्यक्रमास मुकुंद शिंदे , अमृता कर्वा, व इतर सर्व महिलांची उपस्थिती होती.