
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (IMD )इशारा देण्यात आला असून, पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. अनेक भागांत सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (IMD)