सोलापूरात पावसाचा कहर : कुरबावीमध्ये जीवघेणा प्रसंग टळला, गुरसाळ्यात मदतीची प्रतीक्षा

सोलापूर / प्रतिनिधी: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात नीरा नदीला आलेल्या पुरामुळे तीन पुरुष, दोन महिला आणि एका बालकासह एकूण सहा नागरिक अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी इंदापूर येथे तैनात असलेली NDRF (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) पहाटे साडेतीनच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी सर्व नागरिकांची सुरक्षितपणे सुटका केली.
दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेव मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू पूरग्रस्त परिस्थितीमुळे मंदिरात अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम घटनास्थळी दाखल होत आहे.
NDRF आणि जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांचा जीव वाचवण्यात यश आले असून, अजूनही काही ठिकाणी मदत कार्य सुरू आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983