महाराष्ट्रEconomy

प्रवाश्यांना रेल्वेचा मोठा फटका! एसी लोकल धावणार नॉन-एसी

एसी लोकलचा पास असतानाही प्रवाशांना नॉन-एसीमध्ये प्रवास करावा लागणार


मुंबई/सहदेव खांडेकर : मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. २८ मार्च २०२५ रोजी काही एसी लोकल गाड्या नॉन-एसी म्हणून चालवण्यात येणार आहेत. अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

काय आहेत वेळापत्रकातील बदल?

पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, चर्चगेट ते बोरिवली आणि विरारदरम्यान धावणाऱ्या काही एसी लोकल गाड्या त्या दिवशी नॉन-एसी असतील.

डाऊन मार्ग (चर्चगेटहून बाहेर जाणाऱ्या लोकल)

लोकल नंबरमोडकुठून सुटणारवेळशेवटचे स्थानकवेळ
BO 94019स्लोचर्चगेट6.35बोरिवली7.41
BO 94031फास्टचर्चगेट8.46बोरिवली9.30
VR 94041फास्टचर्चगेट10.32बोरिवली11.18
VR 94061फास्टचर्चगेट12.16विरार1.27
VR 94079फास्टचर्चगेट3.07विरार4.30
BY 94097फास्टचर्चगेट6.22विरार7.46
VR 94103स्लोचर्चगेट9.23भाईंदर10.43
VR 94111स्लोबोरिवली11.19विरार11.56
मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ल्याची धमकी: पाकिस्तानी नंबरवरून संदेश, मुंबई पोलिस अलर्ट  

अप मार्ग (चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल)

लोकल नंबरमोडकुठून सुटणारवेळशेवटचे स्थानकवेळ
NSP 94006स्लोनालासोपारा4.50चर्चगेट6.29
BO 94014फास्टबोरिवली7.46चर्चगेट8.42
BO 94026फास्टबोरिवली9.35चर्चगेट10.29
BO 94036फास्टबोरिवली11.23चर्चगेट12.12
VR 94054फास्टविरार1.34चर्चगेट2.53
VR 94074स्लोविरार4.48बोरिवली5.26
BO 94076फास्टबोरिवली5.28चर्चगेट6.27
VR 94092फास्टविरार7.51चर्चगेट9.19
BY 94104स्लोभाईंदर11.56बोरिवली12.11

एसी ऐवजी नॉन-एसी लोकल चालवण्यामागचे कारण स्पष्ट नाही

एसी लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या निर्णयामुळे काहीसा फटका बसणार आहे. एसी लोकलचा पास असतानाही प्रवाशांना नॉन-एसी डब्यांमध्ये प्रवास करावा लागणार आहे. मात्र, यामागचे नेमके कारण पश्चिम रेल्वेने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

प्रवाशांची प्रतिक्रिया

मुंबईतील अनेक प्रवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वातानुकूलित प्रवास करण्याची अपेक्षा असताना अचानक बदल केल्याने एसी प्रवाशांचे नुकसान होणार आहे, असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे.

तांत्रिक कारणामुळे हा निर्णय

रेल्वे प्रशासनाने या बदलाबाबत अधिक माहिती दिली नसली तरी तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button