महाराष्ट्र विधानसभेचे राहुल नार्वेकर दुसऱ्यांदा अध्यक्ष; एकमेव अर्ज दाखल
15व्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (स्पीकर) म्हणून निवडून आले

इन पब्लिक न्यूज वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ८ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. मात्र एकाच अर्ज दाखल झाल्याने सोमवारी 15व्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष (स्पीकर) म्हणून निवडून आले. हा त्यांचा दुसरा कार्यकाल आहे.
राहुल नार्वेकर यांची निर्विरोध निवड झाली कारण विरोधी महाविकास आघाडीने (MVA) त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार उभा केला नाही. त्यांनी रविवारी नामांकन दाखल केले होते. यापूर्वी महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात ते अडीच वर्षांसाठी विधानसभा अध्यक्ष होते.
राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा राजकीय प्रवास
राहुल नार्वेकर शिवसेनेचे वकील ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असा प्रवास असून अनेक संस्थांचेकायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे मुंबई महापालिका तसेच इतर विषयाच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेचे काम राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) करत असत पुढे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही काम केले आहे राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते,याची आठवण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली, ते मुंबईच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आणि सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
नार्वेकर यांनी राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट आणि राष्ट्रवादी कांग्रेस यांच्यात शिवसेना पक्ष व राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरून झालेल्या वादावेळी राहुल नार्वेकर यांनी कौशल्याने परीस्थिती हाताळली होती
विधानसभेतील सदस्य संख्या
• महायुती आघाडी:
भाजप: 132 आमदार
o शिवसेना (शिंदे गट): 57 आमदार
o राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 41 आमदार
o अन्य छोटे पक्ष आणि अपक्ष: 9 आमदार
• विरोधक:
o शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट): 20 आमदार
o काँग्रेस 16 आमदार
o राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): 10 आमदार
महायुतीचा ऐतिहासिक विजय
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला, असून महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला विरोधक फक्त 46 जागांवर मर्यादित राहिले.