पुण्याला पावसाने झोडपले तर पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली!
तज्ज्ञांचे सांगितले :

Covid cases in Pune : कोविड-१९ संसर्ग पुन्हा एकदा आशियामधील काही भागांत वाढताना दिसत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या देशांत रुग्णसंख्या वाढत असतानाच भारतातील काही राज्यांतही सौम्य वाढ नोंदवली जात आहे. जरी देशपातळीवर आकडे मागील लाटांपेक्षा तुलनेत कमी असले, तरी मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादसारख्या प्रमुख शहरांमध्ये रुग्णसंख्येत सौम्य परंतु लक्षवेधी वाढ झाली आहे.
राज्यात कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली
मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८७ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलंय. या वर्षाती पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे. पुण्यात पुन्हा कोरोनाने शिरकाव केल्यामुळे पुणेकर चिंतेत आले आहेत. अशी माहिती पुणे महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
त्यांनी असेही नमूद केले की, सध्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड चाचण्या करण्यात येत नाहीत आणि केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा सुरू आहे.
तज्ज्ञांचे सांगितले :
जग आरोग्य संघटनेने (WHO) मे २०२३ मध्ये कोविड महामारी संपल्याचे जाहीर केले असले, तरी हा विषाणू अजूनही जगभर सक्रिय आहे. भारतात सध्या आढळणारे बहुतांश नवे रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत. कोणतीही मृत्यू किंवा अतिदक्षता विभागात भरती झाल्याची नोंद सध्याच्या लाटेत नाही.
तज्ज्ञांनी वयोवृद्ध, गर्भवती महिला, आणि पूर्वीपासून गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी पूर्वीप्रमाणेच सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. मास्कचा वापर आणि नियमितपणे हात धुणे हे करावे.