PM Narendra Modi's 75th Birthday
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायंकाळी अविस्मरणीय सोहळा रंगला. एस.पी. कॉलेज मैदानावर आकाशात भव्य थ्री-डी ड्रोन शो आणि लाईट शो आयोजित करण्यात आला होता.
या ड्रोन शोमुळे आकाश विविध रंगांनी उजळून निघाले आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात हा देखावा अनुभवला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा थ्री-डी ड्रोन शो पार पडला असल्याने पुणेकरांसाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला. हा भव्य कार्यक्रम केंद्रीय राज्य मंत्री आणि पुणेचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
#WATCH | Pune, Maharashtra: MoS and Pune MP Murlidhar Mohol organised a drone and light show to celebrate PM Narendra Modi's 75th birthday. pic.twitter.com/X8W7EF60Qz
— ANI (@ANI) September 17, 2025
