Vaishnavi Hagawane Case : “हा नीचपणा अन् निर्घृणतेचा कळस…”

पुणे/प्रतिनिधी : पुण्यात 16 मे रोजी घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरवले आहे. वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली असून, ही बाब अत्यंत संशयास्पद असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यानंतर बावधन पोलिस ठाण्यात वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे आणि आणखी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास सुरू
पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जमा करण्यात आले आहेत. फॉरेन्सिक आणि कॉल डिटेल्सच्या आधारे तपास अधिक खोलवर नेण्यात येत आहे.
ही घटना केवळ एक आत्महत्या न राहता समाजातील एक गंभीर इशारा ठरली आहे. स्त्रीसुरक्षा, मानसिक छळ आणि जबाबदारीची जाणीव या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.