सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर/प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून )महाराष्ट्रराज्य मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शनिवार दि.5 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.00 वा. चिंचणी भावळवणी ता. पंढरपूर येथे आगमण व कृषी पर्यटन केंद्रास भेट. व सायं. 5.15 वा. चिंचणी भावळवणी येथून सह्याद्री इसबावी कडे प्रयाण. सायं. 6.15 वा. सह्याद्री इसबावी येथे आगमन व शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सायं. 7.15 वा. सह्याद्री इसबावी येथून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर कडे प्रयाण. व सायं. 7.30 ते 8.00 वाजेपर्यंत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर येथे आगमन व दर्शन . रात्री 8.00 वा . श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर येथून सह्याद्रीनगर इसबावी कडे प्रयाण. रात्री 8.15 वा सह्याद्रीनगर इसबावी येथे आगमण व राखीव .रात्री 9.00 वा . सह्याद्रीनगर इसबावी येथून सुरूची निवासस्थान सातारा कडे प्रयाण करतील.