सांगोला : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते मा. आमदार जयंत पाटील यांच्याबाबत भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी अपशब्दयुक्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी निवेदन दिले.
यावेळी बोलताना दत्तात्रय सावंत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे जेष्ठ नेते मा. आमदार जयंत पाटील यांच्या बद्दल भजपाचे आम. गोपिचंद पडळकर यांनी अतिशय निंदनिय व निषेधार्थ बक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून निषेध करतो व अशी व्यक्ती महाराष्ट्र राज्याची संस्कृती पायदळी तुडवणाऱ्या भाजप सरकारमधील आम. गोपिचंद पडळकर यांच्या आमदारकीचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ घ्यावा व महाराष्ट्राची संस्कृती सुसंस्कृत राखण्यासाठी अशा माणसाला सभाग्रहात येण्यास मज्जाव करावा.
पुढे बोलतान ते म्हणाले, त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तात्काळ गंभीर दखल घेऊन शासनास कळवावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेधार्थ महाराष्ट्रभर तिव्र पडसाद उमटतील याची नोंद घ्यावी.
“केलेल्या वक्तव्याचा जाहिर निषेध…! निषेध…!! निषेध…!!!” असे घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
