देश- विदेश

PM Modi : चहाच्या सुगंधाला चहा विक्रेत्याइतकं कोण ओळखू शकत : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत


इन पब्लिक न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संबोधित करताना त्यांनी सांगितले की संपूर्ण स्टेडियम आनंद आणि उत्साहाने भरलेले आहे. या भव्य कार्यक्रमात चहा बागांचा सुगंध आणि त्यांचं सौंदर्य आहे. चहाच्या सुगंधाला एक चहा विक्रेत्याइतकं कोण ओळखू शकतं, असं म्हणत त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

चराईदेव मोइदमला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा

मोदींनी आपल्या भाषणात नमूद केले की, आसामच्या ऐतिहासिक चराईदेव मोइदम या ठिकाणाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यासाठी भाजप सरकारने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मोदींनी सांगितले की, आसामच्या विकासासोबतच भाजपा सरकार आदिवासी समाजाच्या कल्याणासाठीही मोठे पाऊल उचलत आहे. 

गर्भवती महिलांसाठी 15,000 रुपयांची मदत

मोदींनी चहा बागांमध्ये काम करणाऱ्या महिला कामगारांसाठी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, चहा कामगारांच्या उत्पन्नात सुधारणा करण्यासाठी आसाम चहा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे.विशेषतः गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सुमारे 1.5 लाख महिलांना प्रत्येकी 15,000 देण्यात येत आहेत.

या घोषणा आणि प्रकल्पांमुळे आसाममधील चहा कामगार आणि आदिवासी समाजाला मोठा फायदा होणार आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी पारंपारिक ढोल वाजवला :

आसामच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींनी चहाच्या बागेत काम करणाऱ्या लोकांकडून वाजवले जाणारे पारंपारिक ढोमसा वाजवले. जो चहा बागायती समुदायातील आपल्या बहिणी आणि भावांनी वाजवला जाणारा पारंपारिक ढोल मोदींनी देखील वाजवला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button