PM Narendra Modi : भारताला मोठा आर्थिक बूस्ट! मिशन 500 अंतर्गत 2030 पर्यंत ऐतिहासिक बदल…
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
Rohit Hegade4 weeks agoLast Updated: February 14, 2025
0 1 minute read
File Photo
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिशन 500 अंतर्गत 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ज्याचा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार आहे.
व्हाईट हाऊसमधील उच्चस्तरीय बैठक
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली,जिथे संरक्षण,व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीसंदर्भात मोठ्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये एफ-35 लढाऊ विमान खरेदी आणि पुढील 10 वर्षांसाठी भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
मिशन 500 म्हणजे काय
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,मिशन 500 अंतर्गत 2030 पर्यंत भारत-अमेरिका व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील.
भारताला मोठा फायदा
या भागीदारीमुळे भारताला अनेक क्षेत्रांमध्ये मोठा फायदा होईल :
· रोजगार निर्मिती : हजारो नव्या नोकर्या उपलब्ध होतील.
· संरक्षण भागीदारी : भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ होईल.
· तंत्रज्ञान विकास : आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 5-जी आणि नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढेल.
· नवीन गुंतवणूक : भारतात मोठ्या प्रमाणावर अमेरिकन कंपन्या गुंतवणूक करतील.
मोदी-ट्रम्प यांच्या भेटीचे महत्त्व
या भेटीत भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधांना आणखी गती देण्यासाठी धोरणात्मक चर्चा करण्यात आली. व्यापारासोबतच राष्ट्रीय सुरक्षेसाठीही दोन्ही देशांनी आपले संबंध अधिक दृढ करण्याचे ठरवले आहे.
2030 पर्यंत भारत होणार मालामाल!
या भागीदारीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक मोठा टप्पा गाठण्याची संधी मिळेल. भारताची प्रगती आणि व्यापारवाढीचा हा नवीन टप्पा येत्या काही वर्षांत भारतीय नागरिकांसाठीही मोठे संधीचे दार उघडणार आहे. मिशन 500 मुळे भारत-अमेरिका संबंध एका नवीन उंचीवर जाताना दिसतील आणि भारताच्या आर्थिक,संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव प्रगती होईल.
Rohit Hegade4 weeks agoLast Updated: February 14, 2025