महाराष्ट्र

प्रेमवीराची ‘वरात’ थेट तुरुंगात; दोन मैत्रिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले, एका तरुणीची बलात्काराची तक्रार


कोल्हापूर/प्रतिनिधी: एकाच गावातील, एकाच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दोन जिवलग मैत्रिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यातील एकीशी लग्न केलेला तरुण पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. या प्रकारामुळे ‘प्रेमवीराची वरात’ थेट पोलीस ठाण्यातून कारागृहात वळली. प्रकरण पुढे गेल्यावर पहिली प्रेयसी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

नेमकं काय घडलं?
मुंबईतील खासगी कंपनीत काम करणारा तरुण वय २४ याची २०२२ पासून पुण्यातील कंपनीतील एका तरुणीसोबत ओळख होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून पन्हाळा आणि पुण्यात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान त्याच तरुणीच्या मैत्रिणीसोबतही प्रेमसंबंध प्रस्थापित केले.

काही दिवसांपूर्वी त्याने दुसऱ्या तरुणीशी लग्न केले आणि थेट करवीर पोलिस ठाण्यात हजर होऊन अधिकृत नोंद केली. मात्र ही माहिती मिळताच पहिली प्रेयसी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने झालेल्या फसवणुकीबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली.

पोलीस चौकशीत उघड झाला खरा चेहरा
दोन तरुणींना फसवून प्रेमसंबंध ठेवले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. प्रेयसीने पोलिसांकडे बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानुसार कोडोली पोलीस ठाण्यात तरुणावर प्रधानविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.लग्नासाठी गेलेला पोलिसांच्या तावडीत
लग्नाच्या दिवशीच पोलिस ठाण्यात आलेल्या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. यानंतर त्याची ‘प्रेमाची वरात’ थेट कारागृहाच्या दिशेने वळली


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button