
election
सांगोला : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Election) प्रभाग रचनेचा प्राथमिक आराखडा तयार झाला असून, 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ऑगस्ट अखेरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाईल.(Election) त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आक्षेप व सुचना विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. दरम्यान, सांगोल्यातील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 34 हजार 317 इतकी होती.(Election)
अनुसूचित जातींची लोकसंख्या 8 हजार 503 असून अनुसूचित जमातींची लोकसंख्या 470 आहे. त्यानुसार नवीन प्रभाग आराखड्यात 19 आसनांपैकी 12 सामान्य, 2 अनुसूचित जातींसाठी, तसेच 5 महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
2016 साली नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 10प्रभाग होते व 20 नगरसेवक निवडून आले होते. (Election)
प्रभागाची सरासरी लोकसंख्या 2 हजार 148 असून, तीन सदस्य निवडणाऱ्या प्रभागाची सरासरी लोकसंख्या 4 हजार 376 इतकी असेल. सांगोला नगरपरिषद क्षेत्रात एकूण 23 नगरसेवकांची निवड होणार असून, त्यासाठी 8 तीन सदस्यांचे आणि 7 दोन सदस्यांचे प्रभाग असतील. नगरपरिषदेच्या अंतिम प्रभाग रचनेनंतर निवडणूक प्रक्रिया सुरु होईल. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला. (Election)