सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ दि.१३/११/२०२५ नामनिर्देशनपत्र संख्या : 7 प्राप्त असून यामध्ये एकूण ६ पुरुष उमेदवार व १ महिला उमेदवार यांनी अर्ज दाखल केला.
निवडणूक विशेष : सांगोला नगरपालिका निवडणूक दारात उभी असून तालुक्यातील सर्व पक्षांमध्ये रात्री-अपरात्री बैठकींचे सत्र रंगले आहे. निवडणुकीत शुकशुकाट असला तरी, आतील गोटात युतीच्या चर्चांनी जोर पकडला असून कोण कोणासोबत येणार याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.
अर्ज भरण्यास अवघे ३ दिवस बाकी असताना प्रशासनाकडे फक्त 7 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे माहिती प्रशासनाने दिली. राजकीय वातावरण अधिक रहस्यमय झाले आहे. “हे नेमकं काय प्लॅनिंग? असा सवाल मतदारांनी राजकीय पक्षांना व उमेदवारांना केला आहे.
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५
दिनांक :- १३/११/२०२५
अध्यक्षपदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 0
सदस्यपदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या :- 7
प्रभाग क्र. प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या
1 ब (सर्वसाधारण) 2
2 अ – (अनू. जाती) 2
4 अ-(सर्व. महिला). 1
4 ब-(सर्वसाधारण) 1
5 अ-( नागरीकांचा मागास प्रवर्ग). 1
यामध्ये एकूण ६ पुरुष उमेदवार व १ महिला उमेदवार यांनी अर्ज दाखल केला.
सांगोल्यातील मोठे राजकीय चेहरे व आपापल्या पक्षांचे रणनीतिकार धावपळीत आहेत.
कोणाचा कोणाशी होणार सौदा?
कोणता उमेदवार कोणत्या पक्षात जाणार?
जनता त्यांना पुन्हा संधी देणार की बदलाची हवा येणार?
युतीच्या पाट्या लावण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे मात्र पक्षांकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत अनेक मतदारांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी स्पष्टपणे विचारले :
“अहो, नक्की मतदान होणार ना? की तिहेरी लढत? की एखादं बिनविरोध चित्र उभं राहणार?”
दरम्यान, राजकीय विश्लेषकांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना पुढील दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असा संकेत दिला आहे. सांगोला तालुक्याचे डोळे आता युतीच्या पर्यायांकडे, उमेदवारांच्या हालचालींकडे आणि आगामी निवडणूक रंगल्याचं खऱ्या अर्थाने दर्शन कधी होणार याकडे लागले आहेत.
🛑 निवडणूक रणधुमाळीचा विस्फोटक प्रारंभ! सांगोल्यात शिक्षकांवर दबाव, शिवीगाळ आणि धमक्या? शेकापमध्ये अंतर्गत गटबाजीचा उद्रेक!
