
सांगोला/महेश लांडगे : पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलिसांनी मौजे मेडशिंगी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत १.८१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई ११ मे रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडशिंगी गावातील शेतात लिंबाच्या झाडाखाली काहीजण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यांनतर पोलीस पथकाने छापा टाकला. घटनास्थळी पोहचल्यावर ७ इसमांना पत्त्यांच्या खेळात गुंतलेले आढळून आले.
पकडले गेलेले जुगार खेळाडू पुढीलप्रमाणे:
- राजेंद्र अशोक कोकरे (रा. सांगोला)
- अख्तर मुसा मणेरी (रा. सांगोला) – जुगार अड्ड्याचा मुख्य आयोजक
- सागर शंकर गायकवाड (रा. वासुद)
- अक्षय अगर पदार (रा. मेडशिंगी)
- सिराज ईस्माईल मुजावर (रा. शेगाव जत)
- प्रशांत बबन घनवजीर (रा. मिमनगर)
- विठ्ठल धर्मराज केदार (रा. वासुद)
या सर्वांकडून १,८१,५७० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक गणेश कुलकर्णी यांनी फिर्याद नोंदवली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.