भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मानवंदना

मुंबई/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज १३४ वी आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणा दौऱ्यावर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान विकासाशी संबंधित अनेक उपक्रमांचा ते शुभारंभ करणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूच्यामध्ये लेझर लायटिंग करण्यात आली आहे. या सागरी सेतूवर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तर दुसऱ्या बाजूला अशोक चक्र आणि संविधान यांची प्रतिकृती विद्युत रोषणाईद्वारे करण्यात आली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीमध्येही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण महाराष्ट्रात जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने जळगाव शहरांमध्ये तब्बल 44 मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व ठिकाणचे कार्यक्रम तसेच मिरवणूक शांततेत पार पाडाव्यात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.